Wednesday, 30 December 2020

६७. प्रदिर्घ कविता



तुझ्या नि माझ्या आठवणींचा गाव वेगळा पाहणार मी
त्या रस्त्यावर त्याच ठिकाणी अशी सारखी थांबणार मी 
  
डोळ्यांकाठी आहे ते ही रिते जरासे थोडे जखमी
जायचे कुठे वाट कोणती  कोणत्या सरी  मागणार मी 

वेगवेगळ्या असोत वाटा समोर आल्या चालणार मी
चांगलेच ते वेचले मनी  पडणार तरी वेचणार मी 

राहिल्या जरी काही आशा  काही इच्छा ही कधी मनी
सोबत होते आठवणींची संध्यासमयी डोळापाणी  

बोलत होते ग्रीष्म मनीचे उन्हे वाढली  ओल ही कमी
वसंत येतो आज तिथे ही  फुलले आहे जाणणार मी

राहू द्यावी अशीच माझी  एक मोकळी जरी पोकळी
भरून येई कधी अचानक प्रदिर्घ कविता वाचणार मी



- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...