Saturday, 19 December 2020

६६. कल्लोळ


आनंदाचा ऋतू बहरला
ग्रीष्म सावळा कधीच सरला
निळे निळे आच्छादन झाले
भिरभिर वारा ही वावरला

आली होती शांत शलाका 
सावलीत त्या तो ही निजला
व्रण उरलेले खोलखोल ते
त्यास भिजवुनी पसार झाला

कल्लोळाचा उरला फासा
फिरकी घेतो येता जाता
लहरी वारा स्वार तरीही
झोका माझा तसाच झुलता


- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...