पावसाची वाट तेव्हा मी कशाला पाहिलेली
ओढ ओल्या त्या सरींची अंतरंगी राहिलेली
कोरड्या त्या माळरानी वेल होती कोरडी ती
पावसाचा जोर वाढे नी तशी थेंबात न्हाली
वाहणाऱ्या शांत वाऱ्या भोवती मी वाहताना
ओळ माझी एक कोरी एक होती वाहिलेली
संपले वाटे तुझे वाहून नेणे पावसा रे
सांग आता एकदाचे वीज ही आतूर झाली
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment