Saturday, 1 October 2022

८७. इतकं काही नाही...


थांबा ... थोडे चला थोडे बोला 
सुरवात करा जरी उशीर झाला
ऊन ऊन वाटले तेव्हाच पाऊस आला
इतकं काही नाही  सांगा त्याला...
रिते रिते वाटणारे वाहणारे झाले
नदी काय डोळे काय भरून ही आले
रिते किती ? खडा पडताच कळाले
वेगळेपण कुठून आले या पाण्याला
इतकं काही नाही सांगा त्याला...
आला कोण गेला कोण 
माझे मन त्याचे भान
कोण मोठे अन लहान
अलीकडे कोण दिसतो
कोण पुसतो कुणाला ?
इतकं काही नाही सांगा त्याला...
येतो जातो कधी गातो
कोण घेतो कोण देतो
हिशेब याचा कुठे होतो
निजलेली आशा, दिशा 
माया आणि प्रेम उशाला
इतकं काही नाही सांगा त्याला...

- जुई



No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...