काठोकाठ कपात तरंगणारी साय
आनंद म्हणजे काय ...
फक्त एक कप चाय...
दिवसाची सुरुवात, पावसाची बरसात
शेजारी भजी तळलेली अजून लागतं तरी काय
आनंद म्हणजे काय ...
फक्त एक कप चाय ...
थकलेली काया, जमलोच कधी बोलाया
फक्कड बेत असा कधी कुठे जमलाय
आनंद म्हणजे काय ...
फक्त एक कप चाय...
वाफेवर चहाच्या, आठवणी जगायच्या
चेहऱ्यावर त्या आनंद तेव्हा मी पाहिलाय
आनंद म्हणजे काय ...
फक्त एक कप चाय ...
- जुई
No comments:
Post a Comment