Wednesday, 1 December 2021

७४. पाऊस वारा



त्या सरी बरसुनी आल्या
 येऊनि गेल्या माझ्या दारी
वाहून आणल्या छोट्या मोठ्या 
आनंदाच्या लहरी
कोपऱ्यात ठिबकत होत्या  
सरी वाकड्या त्यातही  थोड्या
पावसात तेव्हा सोडल्यात मी
 स्वप्नांच्याही होड्या

वेगळ्या कोणत्या ना दाखवल्या 
मी वाऱ्याला वाटा
वाहत वाहत तो माग काढूनि 
आलाच कसा चोरटा
सोबत झाली त्याची आता 
अंगणी सरीचा सडा
पाऊस सरींची ओढ लागली 
वारा म्हणे भाबडा

- जुई

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...