Wednesday, 7 October 2020

५३. पहिला पाऊस



पहिल्या पावसाच्या सरीत 
भिजलेला मातीचा सुगंध
अन क्षणात ओलावतात
सुकलेले मनीचे भावबंध
अलगुज मनीचे वाहू 
लागते होऊन बेधुंद
बोलावते ओल्या स्पर्शाची
वाट एक ती अरुंद...

- जुईली अतितकर 

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...