आनंदाचे आले वारे, नाहून निघाले घर सारे
बागडली फुलपाखरे तर कळ्याफुलांशी बोलावे
अडून बसले एक कोडे, उत्तर त्याचे ना सापडे
प्रश्न पडले वेडेवाकडे, तर प्रश्नांशी ही बोलावे
आली लहर जर गप्पांची, सजली मैफिल गाण्याची
हीच भूक हो सुखाची, मिटवण्यासाठी बोलावे
वाटले काही बोलावेसे, परी शब्द ही पडती अपुरेसे
कवितेच्या आधाराने मग ते कडवी मांडून बोलावे
मौनाचे ही नाट्य न व्हावे, सुटावे ते ही बोलते व्हावे
दुजे कुणाचे शब्द नसावे. मनातले ते बोलावे
- जुईली अतितकर
No comments:
Post a Comment