Tuesday, 25 August 2020

२१. तारांगण


क्षणात हुरळून जावे, क्षणात भरून यावे
क्षणात विरून जावे, असे ही काही नाही

कायमचे कोरून घ्यावे, चिरंतन ही राहावे
पुसता ही कधी न यावे, असे ही काही नाही

ऐरणीचा प्रश्न तो व्हावे, प्रत्येकाला कोडे पडावे
उत्तर ही न सापडावे, असे ही काही नाही

सतत वाहत राहावे, थांबूच नये म्हणावे
मागे पुन्हा वळावे, असे ही काही नाही

एक मात्र आठवण, जमावे भोवती तारांगण,  
प्रकाशात ताऱ्याच्या मिळावे असे ही काही

- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...