अवखळ लाटा, निळसर काया
निळ्या नभाची, निळसर छाया
आला आला, बघ सांगावा
दर्यावरचा , निळसर पावा
वाटेवरती, कुण्या वेगळ्या
साद घालते, निळसर माया...
समुद्रातली निळसर माया ...
- ©®जुई
" मनातल्या कविता " काही आठवणीतल्या काही साठवणीतल्या गोष्टींना शब्दात कवितेत मांडले आहे. अनुभव, आवड आणि कल्पना यांचा एकत्र मेळ करत रचलेले ही एक माझी कवितेची ओळ. - जुईली अतितकर
वाट माझी वळणाची हिरव्या पानात वाट माझी सजलेली निबीड रानात वाट माझी नागमोडी डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या सघन खोऱ्यात वाट माझी भाव...
No comments:
Post a Comment