Sunday, 17 March 2024

१०२. वेड

वेड असतं कुणाचं

काही तरी सांगण्याचं,

पानांवरती लिहिण्याचं,

मनातलं ऐकण्याचं.

वेड असतं चित्राचं

निळ्या केशरी रंगाचं,

नाटक विनोदी पात्राचं

कथा कादंबरी पत्राचं

वेड कुणाचं गाण्याचं

दरी डोंगरी जाण्याचं

देशो देशी फिरण्याचं

प्रवास पक्षी होण्याचं

वेड कुणाच घुंगराचं 

ठेका आणि ठुमक्याचं

वेड कोणाच्या असण्याचं

गोड मधुर हसण्याचं 

वेड असतं ज्याच त्याच

ज्याच्या त्याच्या वाटयाच 

मनातलं वाचण्याचं

मनापासून जपण्याचं

- ©®जुई


No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...