Sunday, 5 November 2023

९९. जवान पाहिला होता

हिमालयाच्या टोकावर सन्मान पहिला होता

सीमेवर मी लढणारा जवान पहिला होता


सळसळणारे रक्त धमन्यात उसळणारे

झेलत होते अंगावरती थंडी पाऊस वारे



रक्तात वाहणारा अभिमान पहिला होता

सीमेवर मी लढणारा जवान पहिला होता


सीमेवरच्या युद्धामध्ये वीर मरण ही आले

छातीची ही ढाल करुनि लढायला जे गेले



डोळ्यामध्ये धगधगता संहार पाहिला होता

सीमेवर मी लढणारा जवान पाहिला होता



दूर तिथे त्या सीमेवरती युद्ध न सरते तोवर

या मातीच्या नशीबी यावे कलही सूर अनावर



त्या भूमीवर राष्ट्रभक्तीचा बहुमान पाहिला होता

सीमेवर मी लढणारा जवान पाहिला होता



- जुई





No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...