Thursday, 10 February 2022

७८. वाटले किती

कविता ओळी, गझला गोष्टी
अर्थ वेगळे वाटले किती
शब्द भावना नाती गोती 
अप्रूप त्याचे वाटले किती

तेच चेहरे तेच मुखवटे
पुढे पुढे मग भेटले किती
एकच रस्ता चालत होते
अंतर तिथले गाठले किती 

सुकली पाने पायाखाली 
फुल फांदीवर हासले किती
पहायला ते जग ही मोठे 
तरी वाटते पाहिले किती 

एक भाकरी रोजचीच पण 
तरी नव्याने भाजत होती
स्वप्ने मोठी प्रश्न विचारी 
शिल्लक, बाकी साठले किती

डोळा पाणी पाहुन माझ्या
काळीज त्यांचे फाटले किती 
प्रेम, राग अन क्षणिक रुसवा
त्यातही कोडे वाटले किती 

- जुईली अतितकर

No comments:

Post a Comment

वाट माझी

वाट माझी वळणाची  हिरव्या पानात वाट माझी सजलेली  निबीड रानात  वाट माझी नागमोडी  डोंगर दऱ्यात वाट माझी बाभळीच्या  सघन खोऱ्यात वाट माझी भाव...